PostImage

Ujjwala kale

Feb. 13, 2024   

PostImage

सात दिवसात कशा पद्धतीने ऑनलाईन वस्तु विकून महिलेने कमावले 155 …


गेल्या काही दिवसांत सोशल मीडिया हे उत्पन्नाचं एक साधन बनतंय. ऑनलाइन खरेदी-विक्रीसाठी या माध्यमाचा सर्वाधिक उपयोग केला जातो. एका चायनीज सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने याच माध्यमातून वस्तूंची विक्री करून सात दिवसांत 155 कोटी रुपये कमावले आहेत.@PicturesForlder या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून त्याचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय.

 

पैसे कमावणं सध्या अवघड नाही; मात्र त्यासाठी वापरला जाणारा मार्ग कठीण किंवा सोपा असू शकतो. एका चायनीज मुलीनं ऑनलाइन पद्धतीनं वस्तूंची विक्री करून कोट्यवधी रुपये कमावले आहेत; मात्र तिची विक्री करण्याची पद्धत खूपच विचित्र आहे. ती इतक्या वेगानं वस्तू दाखवते, की पाहणाऱ्यांची पापणी मिटली, तरी एखादी वस्तू त्यांच्या नजरेतून सुटू शकते. या पद्धतीनं तिनं सात दिवसांत 155 कोटी रुपये कमावले आहेत, असा दावा सोशल मीडियावर करण्यात आलाय.

 

चायनीज सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर

काही दिवसांपूर्वी @PicturesForlder या एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. तो आता व्हायरल होतोय. या व्हिडिओत एक मुलगी तिच्याकडच्या वस्तूंची विक्री करताना दिसतेय. ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि लाइव्ह स्ट्रीमरही आहे. लाइव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून ती त्या वस्तू ऑनलाइन विकते. डझनभर वस्तू ती अतिशय कमी वेळात प्रेक्षकांना दाखवते.

 

सात दिवसांत 155 कोटी

ती मुलगी तिच्याकडची प्रत्येक वस्तू प्रेक्षकांना केवळ 3 सेकंद दाखवते आणि लगेचच दुसऱ्या वस्तूकडे वळते. ती ज्या वेगानं वस्तू दाखवते, त्यामुळे त्या नीट पाहताही येत नसतील. त्या वस्तू खरंच पाहायच्या असतील, तर व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक पाहिला पाहिजे. टाइम्स ऑफ इंडियाच्या नोव्हेंबर 2023 च्या रिपोर्टनुसार, त्या मुलीचं नाव Zheng Xiang Xiang असं आहे. ती एक चायनीज लाइव्ह स्ट्रीमर आहे. तिनं या पद्धतीनं आत्तापर्यंत खूप पैसे कमावले आहेत.

 

व्हिडिओ व्हायरल

तिच्या त्या विचित्र पद्धतीनं केलेल्या व्हिडिओला एक्सवर आत्तापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एकानं म्हटलंय, की ही मुलगी 2017 सालापासून लाइव्ह स्ट्रीमच्या बिझनेसमध्ये आहे व या पद्धतीनं ती वस्तू विकते. दुसऱ्यानं म्हटलंय, की चिनी लोकांना टिकटॉकच्या युगातल्या पिढीचा अटेन्शन स्पॅन कमी असल्याची जाणीव आहे. त्याचाच ती फायदा घेत आहे.

 

ऑनलाइन विक्रीचा अनेकांना आतापर्यंत फायदा झाला आहे. चिनी व्यापाऱ्यांना लोकांच्या बदलत्या मानसिकतेचा व तंत्रज्ञानाचा पुरेपूर फायदा घेता येतो. त्याचंच हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल


PostImage

Ujjwala kale

Jan. 18, 2024   

PostImage

वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आग आणि धूर शोधण्याची यंत्रणानागपूर


Vande Bharat Express : रेल्वेतील जाळपोळ रोखण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने 450 एसी कोचमध्ये आता आग आणि धूर शोधण्याची प्रगत यंत्रणा बसविली आहे. ही प्रणाली धूर शोधून प्रवाशांना अलार्म, लाइट इंडिकेटर आणि ऑडिओ साउंडसह सावध करते.प्रवाशांच्या सोयीसाठी, सुरक्षिततेसाठी आणि सर्वोत्तम प्रवास अनुभवासाठी रेल्वेने ही यंत्रणा कार्यरत केली आहे.

 

सरासरी 8 ते 11 स्मोक डिटेक्टर

 

मुख्यत: सध्याच्या घडीला ही फायर आणि स्मोक डिटेक्शन सिस्टीम बिलासपूर-नागपूर Vande Bharat Express वंदे भारत एक्सप्रेस, छत्तीसगडमध्ये वापरली जात आहे. याशिवाय संपर्क क्रांती एक्सप्रेस, शिवनाथ एक्सप्रेस, बिलासपूर-पाटणा एक्सप्रेस, बिलासपूर-पुणे एक्सप्रेस तसेच जनशताब्दीसह दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या 28 जोड्यांच्या डब्यांमध्ये एसी बसवण्यात आला आहे. यामध्ये बिलासपूर सर्व एसी कोच, विभागातील 14 जोड्या गाड्यांच्या पॉवर कार, रायपूर विभागाच्या 13 जोड्या आणि नागपूर विभागाच्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. ही यंत्रणा पँट्री कारमध्ये बसवण्यात आली आहे. प्रत्येक डब्यात सरासरी 8 ते 11 स्मोक डिटेक्टर बसवण्यात आले आहेत.

 

ऑडिओ व्हिज्युअल ध्वनी अलार्म

 

सर्व एसी डब्यांमध्ये आग धुराचा शोध करण्यासाठी ही यंत्रणा सज्ज करण्यात आली असून एसी कोचमध्ये ही यंत्रणा उपयोगी ठरणार आहे. एसी डब्यांमध्ये आग आणि धूर शोध प्रणाली अंतर्गत सुमारे 8-11 स्मोक सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने धुराचा शोध लूपमध्ये कंट्रोल मॉड्यूलशी जोडलेला आहे. Vande Bharat Express आग लागल्यास हे कंट्रोल मॉड्यूल ऑडिओ व्हिज्युअल ध्वनी अलार्म, लाइट इंडिकेटर, प्रीलोडेड घोषणेसाठी लावण्यात आले आहे.

 

सेन्सर कार्यान्वित होणार

 

प्रवाशांना सतर्क करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा उपयोगी ठरणारी आहे. रेल्वेच्या पॉवर कार्स आणि गाड्यांच्या पँट्री कारमध्ये आग आणि धूर शोधण्याची प्रगत यंत्रणा बसविल्याने संभाव्य धोका कमी करण्यात मदत झाली आहे. Vande Bharat Express धुर शोधणारी ही यंत्रणा ट्रेनमध्ये आग लागण्यापूर्वीच अलार्म वाजवेल.त्यामुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवता येणार आहे. आगीची ठिणगी किंवा आगीची घटना लक्षात येताच सेन्सर कार्यान्वित होणार आहे. ट्रेनमध्ये आग लागण्याच्या घटना रोखण्यासाठी आता ही यंत्रणा बसविली आहे.


PostImage

Vande Mataram Express

Oct. 24, 2023   

PostImage

Dasara importance ( दसरा महत्व)


      दसरा दसरा हा सण भारतीय संस्कृतीतील अतिशय लोकप्रिय सण आहे. हिंदू धर्मात हा सण आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दक्षमीला साजरा केला जातो. तसेच तो वर्षतील साडेतीन महुर्तांपैकी एक मानला जातो .कोणत्याही नवीन तसेच शुभ कार्याची सुरुवात  दसऱ्याच्या दिवशी च   केली जाते. धार्मिक परंपरेनुसार दरवषी दसरा हा सण मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरा केला जातो.

      पौराणिक मान्यतेनुसार  अमरत्वाचा वरदान मिळालेल्या रावणाला मारण्यासाठी रामाने देवी चंडीची पूजा करून आशीर्वाद मिळविला. त्यामुळे राक्षस व लकेश्र्वर रावणाचा वध करून   विजय मिळवला. राक्षसाच्या जाचातून  सुटका मिळविल्याचे प्रतीक म्हणून दसरा या सणाला महत्व प्राप्त झाले.

     तसेच देवतना हरहून स्वर्गात राज्य करणाऱ्या  मैस्यासुराला ठार करण्यासाठी मा दुर्गेने नऊ दिवस महिषासुरासी युद्ध करून त्याचा वध केला, म्हणून विजयाचा दिवस समजून विजय दशमी,(दसरा)  सण  साजरा केला जातो .

      शस्त्रपूजा दसऱ्याच्या दिवशी सहस्त्र पूजा करण्याची प्रथा आहे. विजय मिळवण्यासाठी शस्त्राची पूजा केली  जाते.  महाभारत काळात पाच पांडव हे चौदा वर्षे अज्ञात वासात असताना शमीच्या झाडावर आपली शस्त्रे ठेवली होती. ती दसऱ्याच्या दिवशीच त्यांनी बाहेर काढली .ती चौदा   14 वर्षानंतर  जशीच्या तशीच सुरक्षित होती,.  म्हणुन आपट्याच्या झाडाला  महत्व प्राप्त झाले. हा महावृक्ष असून महादोषाचे निवारण करतो. ईस्ट देवतांचे दर्शन घडवितो,. व शत्रूचा विनाश करतो ,.म्हणुन विजय मिळवून देणाऱ्या या झाडाची पाने  सोन म्हणुन दसऱ्याच्या दिवशी लोक एकमेकांना देतात व नमस्कार करून आशीर्वाद घेतात  .

      रावण दहन रावणाचे पुतळे बनवून त्यात स्पोटक पदार्थ  भरून दसऱ्या च्या   दिवशी गावातील प्रतिष्ठित व्यक्तीला राम म्हणून त्याला जाण्यासाठी आमंत्रित करतात. व  खुल्या मैदानात रावणाच्या पुतळ्याला जाळल तात    रावण दहनाच्या वेळी सर्व धर्मातील लोक एकत्र येतात,.  अशा प्रकारे वाईट गोष्टीचा विनाश चांगल्या गोष्टीचा विजय  असा संदेश रावण दहनातून मिळतो .

    दासहरचा 🎨 अर्थ  दस म्हणजे दहा हरा म्हणजे नाश करणे ,पराभूत करणे दहा शिरा च्या  लंकापती रावणाचा नाश केला. तसेच आपण सुद्धा आपल्यातील दहा वाईट गोष्टीचा नाश करण्याचा संकल्प दसऱ्याच्या दिवशी केला पाहिजे ,.सर्व वाईट गोष्टीचा नाश करून चांगल्या गोष्टीचा विजय झाला, म्हणून विजय दशमी( दसरा)  हा सण आपण साजरा करतो.

 


PostImage

Ujjwala kale

Oct. 14, 2023   

PostImage

मराठी समाजासाठी मध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा?


जालना, 14 ऑक्टोबर : अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली. या सभेला लाखोंच्या संख्येनं मराठा समाज उपस्थित होता. या सभेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत

तसेच यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला.

काय आहेत नेमक्या मागण्या?

महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा

कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांच्या कुटुंबीयांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी द्यावी

दर दहा वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करण्यात यावा, तो केलेला नाही, सर्व्हे करून प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात

सारथी संस्थेमार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे सगळे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावेत.

महाराष्ट्रातील मराठा समाजाला 50 टक्क्याच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं तरी चालेल.

मात्र एनटी, व्हीजीएनटीचा प्रवर्ग टिकला तसा टिकला तरच आम्ही ते आरक्षण घेणार, अन्यथा 50 टक्यांच्यावर आरक्षण घेणार नाहीत.


PostImage

Kishor

July 30, 2023   

PostImage

कलयुगात काही चालू आहे माणसे माणसाला भाव देत नाही


*आदिवासी गोवारी समाजाच्या कोतवालाला पाण्यात बुडून हत्या करण्याचा प्रयत्न*
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील हीरपूर येथे विलास नारायण ठाकरे हे आदिवासी गोवारी समाजाचे असलेले गावात  कोतवाल म्हणून अनेक वर्षापासून कार्यरत आहे येथे शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता लेंडी नाला परिसरात रेती ची अवैद्यपणे वाहतूक होऊ नये म्हणून कर्तव्य पार पाडत असताना या गावातील संदीप वंजारी नामक रेतीतस्कराने येऊन येऊन  मला रेती नेऊ दे म्हणून विलास  ठाकरे यांना प्रथम शिविगाळ केली त्यानंतर नाल्याच्या  पाण्याच्या पात्रात बुडवून हत्या करण्याचा प्रयत्न केला व वरून फावड्याने मारहाण केली या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली असली तरी आरोपी अद्यापही फरार आहे या भागाचे आमदार प्रताप अडसड  यांनी दखल घेत विलास ठाकरे यांच्याकडे पोहोचले व आरोपींना त्वरित अटक व्हावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निर्देश दिले आपण आदिवासी गोवारी समाजाचे कार्यकर्ते म्हणून विलास ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे  त्या रेती तस्कराला त्वरित अटक करण्यासाठी आपापल्या तालुक्याच्या तहसीलदाराला व जिल्हाधिकारी यांना निवेदन देणे महत्त्वाचे आहे तेव्हाच आदिवासी गोवारी समाजाच्या या विलास ठाकरे यांना न्याय मिळेल


PostImage

Kishor

July 29, 2023   

PostImage

एक साज एक आवाज मोहम्मद रफी ....सुरीली आवाज के फनकार


आदमी मुसाफिर है, आता है, जाता है,
आते-जाते रस्ते में यादें छोड़ जाता है...

मोहम्मद रफ़ी साहब, मन्ना दा, मुकेश जी और किशोर दा प्लेबैक सिंगिंग में एक दूसरे के प्रतिस्पर्धी होने के बावजूद आपस में न केवल बहुत अच्छे दोस्त थे वरन् दुख-सुख में भी हमेशा साथ होते थे।

ये 27 अगस्त 1976 की बात है, मुकेश जी का अमेरिका (डेट्रायट, मिशिगन) में एक म्यूजिकल प्रोग्राम होना था। इस वजह से उस दिन वे सुबह जल्दी उठ गए थे। नहाते वक्त अचानक उन्हें सीने में दर्द महसूस हुआ। उन्हें दिल का दौरा पड़ा था। आनन-फानन में उन्हें अस्पताल ले जाया गया लेकिन अफसोस, तब तक मौत उन्हें अपने आगोश में ले चुकी थी। रफ़ी साहब को जब अपने जिगरी दोस्त की अचानक मौत की खबर हुई तो उन्हें बड़ा गहरा सदमा लगा, वे बिल्कुल गुम-सुम से हो बैठे।

 

अंतिम संस्कार के लिऐ उनके शव को अमेरिका से भारत लाया गया। 

मुकेश जी के अंतिम संस्कार के एक दिन पहले अचानक रफ़ी साहब की भी तबीयत बिगड़ गई। उनकी गर्दन में नस के ऊपर एक फोड़ा हो गया था। संक्रमण की वजह से उन्हें बुखार भी आ गया था। इस वजह से उन्हें बांद्रा के नर्सिंग होम में दाखिल होना पड़ा। 

अगले दिन सुबह उनको तेज दर्द के साथ शदीद बुखार भी था, इसके बावजूद उन्होंने डॉक्टर से गुजारिश की कि हर हाल में मुझे कुछ देर के लिए वहां जाना है। 

डॉक्टर ने बहुत समझाया कि फिलहाल आप कहीं नहीं जा सकते हैं, क्योंकि आपको अभी आराम की सख्त जरूरत है, लेकिन वे बेचैन बने रहे।

बक़ौल यास्मीन रफ़ी, मैं जब अब्बा के लिए सूप लेकर नर्सिंग होम पहुंची तो वे पलंग पर खामोशी के साथ लेटे हुए थे। उनकी आंखें बता रही थी कि वे रोए भी हैं। उन्हें सूप देते हुऐ कहा 'आप गर्मा-गर्म सूप पी लीजिए, इससे आपको आराम मिलेगा।' 

सूप पीते-पीते उन्होंने अचानक छोड़ दिया और फौरन पलंग से उतर कर कहने लगे, "अपना यार चला गया और ये लोग कहते हैं मत जाओ, मैं यहां पर क्या कर रहा हूं ? मुझे अभी जाना है !" 
तुरंत उन्होंने जहीर भाई से गाड़ी मंगवाई। 

सभी मना करते रह गए पर रफ़ी साहब नहीं माने और अपने दोस्त को हमेशा-हमेशा के लिए अलविदा कहने नर्सिंग होम के पिछले दरवाजे से रवाना हो गए।

यास्मीन जी बतातीं हैं कि जब वे वहां से लौटे तो बहुत थक चुके थे, लेकिन उनके चेहरे पर सुकून नजर आ रहा था। मानो, अपने यार को नजदीक जाकर अलविदा कहने से उनके दिल को थोड़ा सुकून मिल गया हो